🕒 1 min read
सोलापूर : महाराष्ट्र तसेच देशाचे राजकारण, प्रशासन, समाजकारण, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार पद्मविभूषण शरद पवार यांचे कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी अन् अभिमान वाटावा असे आहे. यामुळेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सभेत शरद पवार यांना डी.लिट पदवी देण्याचा ठराव संमत झाला आहे.
दरम्यान, सोलापूर विद्यापीठातर्फे देण्यात येणारी ही दुसरी डी.लिट पदवी असणार आहे.सोमवारी झालेल्या २३ व्या बैठकीत हा ठराव सिनेट सदस्य सचिन गायकवाड यांनी मांडला. याला सिनेट सदस्य राजा सरवदे, प्रा. राजेंद्र गायकवाड, चंद्रकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले. त्यास अधिसभेने बहुमताने मान्यता दिली.
सोलापूर विद्यापीठातर्फे पहिली डि. लिट पदवी ही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली आहे. तर 2014 साली ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एस्सी) या मानद पदवीने सन्मानित केले होते.
दरम्यान,या विषयाला सिनेट सभेत मंजुरी मिळाली असली तरी त्यापुढील विविध टप्प्यात हा प्रस्ताव दाखल होऊन अखेरीस राजभवनातून याबाबतची मंजुरी मिळाल्यानंतर हा पदवीप्रदान सोहळा होणार आहे. प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेने शरद पवार यांना डी. लिट. पदवी देऊन विद्यापीठाच्या वतीने गौरव करण्यात यावा अशी मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज होणार १०० टक्के माफ; परभणी मनपाचा निर्णय
- कर्णधार कोहलीच्या ‘या’ निर्णयावर लक्ष्मणची नाराजी
- घरपट्टी व नळपट्टीवरील व्याज होणार १००% माफ; परभणी मनपाचा निर्णय
- विराट कोहलीचा मोठा पराक्रम! सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
- तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचे जोरदार पुनरागमन; भारताचा ८ गडी राखुन पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
