Share

 केजरीवाल हे मानसिक संतुलन गमावून बसले आहेत – मनोज तिवारी

Published On: 

🕒 1 min read

 टीम महाराष्ट्र देशा:- एनआरसीच्या मुद्यावरून राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजपाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यातील चांगलाच वाद उफाळून आला आहे. आसाममधील अधिकृत नागरिकांची एनआरसी यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. या एनआरसीच्या मुद्द्यावर तिवारी यांनीदेखील दिल्लीत एनआरसी प्रक्रिया लागू करावी, अशी मागणी केली होती. मात्र त्यावर जर दिल्लीत एनआरसी लागू केली, तर मनोज तिवारी यांना सर्वात आधी दिल्ली सोडावी लागेल, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले होते.

त्यानंतर तिवारी यांनीदेखील केजरीवाल हे मानसिक संतुलन गमावून बसले आहेत. या शब्दात त्यांना पलटवार केला. ते म्हणाले  जो कोणी पूर्वांचलामधुन आला आहे, तो घुसखोर आहे का? त्याला तुम्ही दिल्लीमधुन हाकलू इच्छित आहात? जे लोकं अन्य राज्यांमधुन दिल्लीत वास्तव्यास आले आहेत, त्यांना तुम्ही परदेशी मानता का? तुम्हाला त्यांना दिल्लीतुन हाकलायचे असेल तर, तुम्ही देखील त्यातीलच एक आहात. जर केजरीलवालांचा असाच हेतू असेल तर मग मला असे वाटते की, ते आपले मानसिक संतुलन गमावून बसले आहेत. एखाद्या ‘आयआरएस’अधिकाऱ्यास ‘एनआरसी’काय आहे हे कसे माहिती नाही? अशी घणाघाती टीका त्यांनी केजरीवाल यांचावर केली.

दरम्यान, मुंबई, हरयाणापाठोपाठ भाजपाचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांच्याकडून विविध कार्यक्रमात दिल्लीत एनआरसी लागू करण्याच्याबाबत त्यांनी मागणी केली होती. “घुसखोरांमुळे दिल्लीतील स्थिती खुप धोकादायक होत आहे. दिल्ली धोकादायक होऊ द्यायची नसेल तर एनआरसी लागू करणे गरजेचे आहे. जे स्थलांतरित लोक अवैधपणे दिल्लीत राहतात हे सर्वात धोकादायक आहे. त्यामुळे इथे एनआरसी लागू करावी,”असं तिवारी म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1176849841336406020?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176861157191081984?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!