Share

न्यायालयीन कोठडीचे आदेश मिळताच मनोहर भोसलेला करमाळा पोलीसांनी घेतले ताब्यात

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : संत बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या मनोहरमामा ऊर्फ मनोहर भोसले सध्या चांगलेच अडचणीत सापडले असल्याचे पहायला मिळत आहे. अघोरी पद्धतीने उपचार आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी अटक केलेल्या मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस कोठडी संपल्याने त्याला बारामती न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मनोहरमामाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एन. व्ही. रणवीर यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान आता न्यायालयीन कोठडीचे आदेश मिळाल्यानंतर करमाळा पोलीसांनी मनोहर भोसलेला ताब्यात घेतले आहे.

तर पोलिसांनीच न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे पोलीस संशयास्पद वागत आहेत म्हणून पोलिसांविरोधात मनोहर भोसले यांचे वकील उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती अॅड. रुपाली ठोंबरे यांनी सांगितले आहे. दरम्यान बारामतीत कर्करोग बरा करण्याचा दावा करत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. तर सोलापुरात आश्रमात येणाऱ्या एका महिला शिष्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा मनोहर भोसलेवर दाखल करण्यात आला आहे. मनोहर भोसले सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरी, मनोहर पासून सद्गुरू मनोहर मामा होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास आश्चर्य वाटायला लावणारा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!