औरंगाबाद : स्व-विकास कलारसास्वाद विषय हा अत्यंत महत्वाचा असल्याने हा विषय वैकल्पिक न ठेवता तो पुन्हा पूर्वरत करावा. नवीन संचमान्यता मध्ये पूर्वीप्रमाणेच कला शिक्षक हा विशेष शिक्षक म्हणूनच गणला जावा. ए.एम. केलेल्या कला शिक्षकाला वेतनश्रेणी त्वरित मिळावी.
तसेच विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक शाळेत कला शिक्षक घेण्यात यावा. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे, औरंगाबादच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड , शिक्षण आयुक्त महाराष्ट राज्य यांना ईमेलद्वारे कलाशिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.
स्व-विकास व कलारसास्वाद हा विषय वैकल्पिक गटात समाविष्ठ करण्यात आला आहे. सदर विषय विद्यार्थी प्रिय झाला असून ९ वी, १० वी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी जागतिकीकरणाच्या २१ व्या शतकामध्ये आवश्यक असलेली जीवनकौशल्ये आत्मसात करण्यासाठी व विद्यार्थ्याच्या कला विषयक करियरच्या यशस्वी वाटचालीकरीता अत्यंंत महत्वाचा असा विषय आहे.
स्व-विकास कलारसास्वाद विषय हा अत्यंत महत्वाचा असल्याने हा विषय वैकल्पिक न ठेवता तो पुन्हा पूर्वरत करावा. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजयकुमार गोसावी, उपजिल्हाध्यक्ष संदिप पाटील, सचिव सचिन भोरे, सहसचिव नितिन वेताळसह आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ना शिक्का, ना पोस्टर…रुग्ण फिरताहेत बिनघोर!
- फडणवीसांचा नेमका विश्वास आहे तरी कुणावर? मुख्य सचिवांच्या अहवालावरही केले प्रश्न उपस्थित
- शेतकऱ्यांची भारत बंदची हाक, मात्र पंतप्रधान विदेश वारीत व्यस्थ – नाना पटोले
- कोरोनामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा
- शहरातील रस्त्यांची कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा, पालकमंत्र्यांनी टोचले मनपाचे कान


