औरंगाबाद : शहरात दररोज दिड हजारांवर रुग्ण निघत आहेत. मात्र त्या तुलनेत आरोग्य सुविधा पुरवणारी यंत्रणाच कोलमडल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण शहरभर बोंबलत फिरतांना दिसत आहेत. सध्या सौम्य लक्षणे असणारे ३७८५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र खरोखर हे रुग्ण चार भिंतीच्या आत आहेत का? हे पाहण्याची जबाबदारी असलेले पथक याठिकाणी कुठेही फिरतांना दिसून येत नाही.
अनेक होम आयसोलेटेड पॉझिटिव्ह रुग्ण स्वतः बाहेर फिरत जीवनावश्यक वस्तू, औषधी खरेदी करतांना दिसतात. यांच्यावर कोणाचाही आणि कुठलाही अंकुश नसल्याने तसेच कोणाच्याही घरावर ‘इथे कोरोना रुग्ण आहे’ अशी पाटी नाही तर हातावर क्वारन्टाईनचा शिक्का नाही. त्यामुळेच पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख ती काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गतवर्षी कोरोनाच्या सुरुवातीला रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल महापालिकेकडे येताच त्या त्या भागातील आरोग्य केंद्राद्वारे रुग्णाच्या घरापर्यंत कर्मचारी पोहोचत असे. त्यानंतर अँब्युलन्स, स्मार्ट सिटी बस यातून रुग्णांना सरळ कोविड सेंटर अथवा आवश्यकतेनुसार घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालय याठिकाणी नेले जात असे. मात्र आता पॉझिटिव्ह आल्याचे कळल्यानंतर रुग्ण स्वतःच रिक्षाने कोविड सेंटरमध्ये जातो.
ज्यांच्याकडे होम आयसोलेशनसाठी सुविधा आहे अशांना होम आयसोलेट केले जाते. मात्र त्यानंतर होम आयसोलेशन सर्टिफिकेट साठी इतर गोष्टींच्या पूर्ततेसाठी अनेक रुग्णांना मनपाद्वारे कुठल्याही प्रकारचे कॉल आले नसल्याचे समजते. त्यामुळे या होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर अंकुश ठेवणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फक्त पहिल्या दिवशी केली विचारपूस
पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारलेल्या शहरातील एका रुग्णास महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पहिल्या दिवशी संपर्क केला. कुठे उपचार घेत आहात? इत्यादी बाबी विचारल्या. त्यानंतर गेले चार ते पाच दिवस उलटले मात्र महापालिकेकडून पुन्हा चौकशी करण्यात आलेली नाही. यासारखीच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची परिस्थिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा
- शहरातील रस्त्यांची कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा, पालकमंत्र्यांनी टोचले मनपाचे कान
- ‘रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना बिल्डरांकडून खंडणी गोळा करायच्या’
- वाळूची चोरटी वाहतुक करणारा टिप्पर पोलिसाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न
- कोरोना निगेटिव्ह असाल तरच या, राजस्थानच्या रेल्वे विभागाचा महाराष्ट्राला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

