Share

त्यांचा बोलवता धनी कोण हे पोलीस शोधतीलच; मनिषा कायंदेंचा रोख नेमका कोणाकडे???

Published On: 

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती, असे किशोरी पेडणेकर यांचे म्हणणे होते आणि याच टीकेमुळे पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर किशोरी पेडणेकरांना आलेल्या धमकी पत्राने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावर आता शिवसेनेचे आमदार मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. संबंधित पत्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला असून महापौरांना अशा पद्धतीचे पत्र येणं दुर्देवी असल्याचे म्हणत आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

अतिशय हीन पातळीचे राजकारण सुरु आहे. सभागृहातील विषय असो किंवा सभागृहाबाहेरील विषय, विरोधक सत्ताधाऱ्यांमधील तू-तू मै-मै समजू शकतो पण अशा प्रकराचे कृत्य महाराष्ट्रामध्ये ही पहिली वेळ आहे की, एखाद्या महिला महापौराला अशा प्रकारचे गलिच्छ पत्र मिळाले आहे, असे मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात झालेलं वातावरण शेतकरी कायदे मागे घ्यावे लागले. या सगळ्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन भाजपकडून काहीही बोलले जात आहे. वाटेल ते बोलणे सुरु आहे. बिनबुडाचे आरोप करायचे त्यामुळे हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पत्र लिहणाऱ्यांचा बोलवता धनी कोण आहे हे मुंबई पोलीस नक्कीच शोधून काढतील. आमच्या पक्ष प्रमुखांच्या आदेशाप्रमाणे पुढील पावले टाकली जातील, असे मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!