Share

देवगडच्या नावाने विकला जातोय कर्नाटकी आंबा, भोळ्याभाबड्या ग्राहकांची होतेय फसवणूक

Published On: 

पुणे – सद्यस्थितीत आंब्याचा हंगाम सुरु असल्याने कोकणातील रत्नागिरी, देवगड या भागाबरोबरच कर्नाटकातूनही पुण्यात आंबे दाखल होत आहेत. रसाळ आंबे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणून त्यांच्या किमतीही जास्त असतात. अशाच परिस्थितीत नागरिकांची फसवणूक करत विक्रेते आंब्यांची अदलाबदल करून विक्री करू लागले आहेत.

कर्नाटक जातीच्या आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री करत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या तीन अडत्यांवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं आज कारवाई केली. तसंच या अडत्याकडून १७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ग्राहकांच्या फसवणुकीचे हे प्रकार वारंवार घडत आहेत; त्यामुळे पहिल्यांदा असा प्रकार झाला तर पाच हजार रुपये, दुसऱ्या वेळी दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल अन् पुन्हा असा प्रकार झाला तर त्या आडत्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असं समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी आज सांगितलं.

सोमवारी गेट नं. ७ येथील आंबा बाजाराला गरड यांनी भेट दिली. यावेळी काही अडते कर्नाटक येथून येणार आंबा कोकणातील ‘देवगड हापूस’ या नावाने विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘देवगड हापूस आंबा’ या नावाच्या पेटीत कर्नाटक येथील आंबा भरून त्यामध्ये तो विकला जात होता. यामुळे गरड यांनी तीन आडत्यांवर कारवाई केली आहे.

कर्नाटक येथील आंबा ‘देवगड हापूस आंबा’ या नावाच्या पेट्यामध्ये तो विकला जात होता. त्यामुळे पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच दुसऱ्या वेळेस दहा हजार रुपये दंड वसूल केला जाईल. त्यानंतर तसा प्रकार आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!