Share

‘निवडणूक आयोगाची गाडी बिघडल्यावर भाजपची गाडी कशी मिळाली ? याचही उत्तर मिळणार नाही’

Published On: 

मुंबई : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

दरम्यान आसाम आणि प. बंगाल मध्ये दोन टप्प्यातील निवडणुका झाल्या आहेत यामध्ये काही गैरप्रकार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आसाममधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला. ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले. महत्त्वाचे म्हणजे ज्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडले ती गाडी भाजपा उमेदवाराची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विरोधकांनी भाजपावर टीका करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या प्रकरणावरून भाजपवर जहरी टीका केली आहे. ‘ईव्हीएम बिघडल्यावर कोणतेही बटण दाबले, की मत भाजपलाच कसे जाते, याचे समाधानकारक उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाची गाडी बिघडल्यावर त्यांनाही ईव्हीएम नेण्यासाठी भाजपचीच गाडी कशी मिळाली, याचेही उत्तर मिळण्याची शक्यता नाही.’ असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून करण्यात आपले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!