Share

आरोग्य कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Published On: 

औरंगाबाद : आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले मारहाण आणि अरेरावीची भाषा याबाबत कठोर कारवाई व्हायला हवी यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांना निवेदन दिले आहे.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी तपासणीसाठी स्वॅब घेणे, लसीकरण करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग इत्यादी कामांसाठी प्रत्यक्ष फिल्डवर असतात. परंतु अनेक वेळा जनतेतून त्यांना विरोध केला जातो. या अधिकारी आणि कर्मचारी यांना दमदाटी, मारहाण होणे, वरुड काझी येथील वैद्यकीय अधिकारी यांना वरुड काजी चे सरपंच दिलावर बेग यांनी यांनी मारहाण केली.

तर अडुळ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावातून काम बंद करून हाकलून देण्यात आले लासुरगाव येथील आरोग्य सेविकेस गावाच्या उपसरपंचाकडून दमदाटी करण्यात आली. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. वरील सर्व प्रकारांचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने धिक्कार केला. आणि संबंधित गुन्हेगारावर आरोग्य विभागाच्या कामकाजात अडथळा आणत कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीस रवींद्र पंडित, तालुका सरचिटणीस मिलिंद गोमटे, जिल्हाध्यक्ष संतोष चौधरी यांची यावेळी उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!