🕒 1 min read
मुंबई – शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात मुबई उच्च न्यायालयात १०० कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी करुन जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतीमा मलिन करुन मानसिक त्रास दिल्या प्रकरणी हा दावा दाखल केल्याची माहिती वायकर यांनी दिली.
नोटीस दिल्यानंतरही सोमय्या यांनी माफी न मागितल्याने अखेर वायकर यांनी सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रुपये 100 कोटींचा अबुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एवढेच नव्हे तर लवकरच याप्रकरणी सोमय्यांविरोधात फौजदारी दावाही दाखल करणार असल्याचं वायकर यांनी सांगितलं.
अलिबाग कोर्लई येथील संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध समाजमाध्यमांद्वारे केला होता.
यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा तसेच या दोघांमधील आर्थिक हितसंबंध काय आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. महाकाली गुंफा येथील जमिनप्रकरणी वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवांकडून 25 कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्यांनी पत्रकार परिषदेत विविध समाजमाध्यमांद्वारे केला. हे आरोप करतानाही त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नाहीत
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- राज्य सरकारने उद्योग क्षेत्राचा विश्वास गमावल्याने महाराष्ट्राच्या जीएसटी संकलनात घट?
- ‘चिंता नको… ! पवारसाहेब उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत’
- पुण्यात मिनी लॉकडाऊन जाहीर, पण दहावी-बारावीसह MPSC परीक्षा होणार
- मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले दिसणार आता या हिंदी मालिकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
