Share

Mamata Banerjee | पार्थ चॅटर्जींना मंत्रिपदावरून हटवले; ईडीच्या कारवाईनंतर ममता बॅनर्जींनी घेतला निर्णय

Published On: 

🕒 1 min read

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले पार्थ चॅटर्जी यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून हटवले आहे. अटकेनंतर 5 दिवसांनी ममता यांच्या सरकारने ही कारवाई केली आहे. दरम्यान ईडीने मारलेल्या छाप्यात पार्थची जवळची सहकारी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातून २७.९ कोटी रुपये रोख आणि ५ किलो सोने जप्त केले आहे.

अर्पिताला या रकमेबाबत विचारले असता, हे सर्व पैसे पार्थ चॅटर्जींचे असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, “पार्थ पैसे ठेवण्यासाठी या घराचा वापर करायचे. एवढी रोकड घरात ठेवली असेल याची मला कल्पनाही नव्हती”. तर या सर्व कारवाईनंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पार्थ यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली त्यामुळेच ममता सरकारने हा निर्णय घेतला.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, “अर्पिताने याआधी कधीही सांगितले नव्हते की तिच्या दुसऱ्या फ्लॅटमध्येही रोख रक्कम ठेवली आहे. मात्र आम्ही घरावर छापा टाकला तेव्हा आम्हाला 2000 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. 2000 रुपयांच्या नोटांपासून 50 लाख रुपयांचे बंडल आणि 500 ​​रुपयांच्या नोटांपासून 20 लाख रुपयांचे बंडल बनवण्यात आले. 4.31 कोटी रुपयांचे सोनेही मिळाले. यामध्ये प्रत्येकी 1 किलोच्या 3 सोन्याच्या विटा, 6 बांगड्या आणि एक सोन्याचा पेन सापडला आहे. अर्पिताच्या फ्लॅटमधून 3 डायरीही सापडल्या आहेत, ज्यामध्ये कोडवर्डमध्ये व्यवहाराची नोंद केलेली आहे. तपास यंत्रणेने घरातून 2,600 पानांचे कागदपत्रही जप्त केले आहे, ज्यामध्ये पार्थ आणि अर्पिताच्या संयुक्त मालमत्तेचा उल्लेख आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!