Aurangabad । औरंगाबाद : सध्या शिवसेनेची सुरु असलेली गळती थांबण्याचं दिसत नाहीये. त्यातच आता औरंगाबाद मधून मोठी बातमी समोर येत आहे.ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर आता राज्याच्या प्रमख शहारांतील महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद महापालिकेचा देखील समावेश आहे. सध्या औरंगाबाद महापालिकेमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. औरंगाबादमधील शिवेसनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याची तयारी आता भाजपाने सुरू केली आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपा शिंदे गटासोबत युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. यानंतर आता यावर शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
घोडेले म्हणाले कि, मात्र शिंदे गट हा केवळ भाजपची कठपुतळी बनून काम करत आहे. त्यांनी युती केली तरीही औरंगाबादेत यश मिळणार नाही. औरंगाबाद महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार, असा दावा वक्तव्य त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी बाळासाहेबांचा फोटो आणि नाव न वापरता निवडणूक लढवून दाखवावी. त्यांच्या गटात शिवसेनेचे तीन नगरसेवक सोडून एकही नगरसेवक सामील होणार नाही. संपूर्ण शिवसेना एकदिलाने ही निवडणूक लढवेल आणि औरंगाबाद महापालिकेवर शिवसनेचाच भगवा फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विशेष म्हणजे औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपाच्या बाबतीत पहिली प्राथमिक बैठक सुद्धा पार पडली आहे. शिंदे गट आणि भाजपा औरंगाबाद महापालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याच्या वृत्ताला भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांकडून देखील दुजोरा देण्यात येत आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच निवडणूक लढवण्याबाबतची रणनीती आणि जागावाटपाचे सूत्र ठरण्याची शक्यता आहे. पुढील काळात आणखी काही बैठका होणार असून त्यांनतर अंतिम निर्णय होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी पाऊण लाखाची मदत करावी – अजित पवार
- Sanjay Raut | कोणतीही कारवाई केली तरीही, गुडघे टेकवणार नाही – संजय राऊत
- Shamshera Movie | “माझ्या प्रिय शमशेरा…”; दिग्दर्शक करण मल्होत्राने केली भावनिक पोस्ट
- OBC Reservation | सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला झटका! 365 ठिकाणी OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होणार
- Eknath Shinde : “संजय राऊतांना सत्तांतराची स्वप्न रंगवू द्या, पण सरकार…”; एकनाथ शिंदेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

