Sushma Andhare । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत ५० आमदार सोबत घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. यामध्ये शिवसेनेचे ४० आमदार होते. यानंतर शिवसेनेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक महापालिकेतील नगरसेवक आणि त्यानंतर तब्बल १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल आहे. सध्या शिवसेनेची सुरु असलेली गळती थांबण्याचं दिसत नाहीये. मात्र त्यातच आता शिवसेनेसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. त्यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली. यावेळी ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग अशा सर्व स्वायत्त संस्थांना हाताशी धरुन जर इथं संविधानिक लोकशाहीची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जात असेल तर अशावेळी भाजपविरोधात निकरानं झुंज देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्यासोबत आम्ही धर्मनिरपेक्षतावादी लोकांनी असलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय म्हणून मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असं अंधारे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडलं आहे, यानंतर शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यातच सुषमाताई अंधारे यांच्या माध्यमातून शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला नवा चेहरा मिळणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा सुषमाताई अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिव शक्ती – भिम शक्ती असा नारा ऐकायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Arpita Mukharjee | अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावर छापा; 29 कोटींची रोकड आणि सोनं जप्त
- Aurangabad : भाजप-शिंदे गटाने युती केली तरीही औरंगाबाद महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच भगवाच फडकणार…
- Ajit Pawar | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी पाऊण लाखाची मदत करावी – अजित पवार
- Sanjay Raut | कोणतीही कारवाई केली तरीही, गुडघे टेकवणार नाही – संजय राऊत
- Shamshera Movie | “माझ्या प्रिय शमशेरा…”; दिग्दर्शक करण मल्होत्राने केली भावनिक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

