Share

ऑलिंपिक पदकविजेता पी.श्रीजेश बनला “वर्ल्ड गेम अँथलीट ऑफ द इयर”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: २०२१ मध्ये भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिंपिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. ज्यात त्यांनी मोठ्या कालखंडानंतर इतिहास रचत पदकही जिंकले होते. त्याच संघात असलेला भारताचा अनुभवी हॉकी गोलकीपर पी आर श्रीजेश याने सोमवारी प्रतिष्ठित वर्ल्ड गेम्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला.त्याच्या प्रभावी कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे. याआधी २०२०मध्ये, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल २०१९ मध्ये तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली होती.

स्पॅनिश क्रीडा गिर्यारोहक अल्बर्टो गुइनेस लोपेझ आणि इटालियन वुशू खेळाडू मायकेल जिओर्डानो यांना मागे टाकत श्रीजेशने हा पुरस्कार मिळवला आहे . श्रीजेशने हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर म्हटले आहे की, “हा पुरस्कार जिंकल्याबद्दल मला अत्यंत सन्मानित वाटत आहे. या पुरस्कारासाठी माझे नामांकन केल्याबद्दल सर्वप्रथम FIH ( INTERNATIONAL HOCKEY FEDERATION ) आणि जगभरातील भारतीय हॉकीच्या चाहत्यांचेही आभार ज्यांनी मला मत दिले आहे.”

पुरस्कार जिंकण्यासाठी पी श्रीजेशला १,२७,६४७ मते मिळाली होती. या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला श्रीजेश हा एकमेव भारतीय होता. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) त्याच्या नावाची शिफारस केली होती. ऑक्टोबरमध्ये FIH स्टार्स अवॉर्ड्समध्ये श्रीजेशला २०२१ चा गोलकीपर ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!