Share

‘मामा, ऊन जरा जास्तच आहे’, आरामाच्या नावाखाली वृद्धाला लुटले

Published On: 

बीड : आठवडी बाजारातील बिटवर बाजार करत असलेल्या वृद्धाला थाप मारून एका भामट्याने शहराबाहेर नेले. वाटेत शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन वृद्धाच्या हातातील अंगठी आणि खिशातील १० हजार रुपये असा ३१ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. ही घटना केज तालुक्यातील साळेगाव रस्त्यावर घडली.

केज तालुक्यातील तांबवा येथील भगवान मारुतीराव कराड (७०) हे मंगळवारी सकाळी शेवग्याच्या शेंगा व कांदे घेऊन केज शहरातील मंगळवारच्या आठवडी बाजारात बिटवर विक्री करून घरी नेण्यासाठी भाजीपाला खरेदी करत होते. याच वेळी बंडू ऊर्फ माणिक सिरसट (रा. आरणगाव ता. केज) याने चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर त्याने ‘गुंड वस्तीवर मुलीला मुलगा पाहण्यासाठी जायचे आहे. मामा तुम्ही वयस्कर आहात, माझ्यासोबत चला असे म्हणाल्याने ते दोघे पायी चालत असताना ऊन जास्त आहे. थोडे आपण झाडाखाली थांबू’ असे म्हणून त्याने जुन्या साळेगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला बोरीच्या झाडाखाली नेले.

तेथे त्याने बिस्कीट खाण्यास दिले, खिशातून शीतपेयाची बाटली काढून पिण्यास दिली. गुंगी आल्यानंतर बंडू उर्फ माणिक सिरसट याने त्यांच्या हातातील ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी व खिशातील १० हजार रुपये असा ३१ हजारांचा ऐवज घेऊन तेथून पोबारा केला. ते शुद्धीवर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!