Share

पूजा चव्हाण प्रकरण : धक्कादायक ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

Published On: 

पुणे : मूळची परळी येथील २२ वर्षीय पूजा चव्हाण शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला आली होती. ती आपला चुलत भाऊ आणि त्याच्या एका मित्रासोबत महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीमध्ये राहात होती. याच सोसायटीत तीने आत्महत्या केली.पूजाच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, आता या प्रकरणाशी संबंधित एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.दरम्यान,या प्रकरणाची चौकशी करा म्हणून भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना निवेदनही दिलं आहे.

या ऑडिओमध्ये एक व्यक्ती ‘ती आत्महत्या करणार आहे’ असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असे देखील ती म्हणत आहे. त्यामुळे संभाषण करणाऱ्या दोन व्यक्ती कोण आहेत असा देखील यानिमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आणि विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या संबंधाच्या पैलूची देखील सोशल मिडीयावर चागलीच चर्चा आहे. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचं नाव जोडलं जात असल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!