Share

औरंगाबादचं संभाजीनगर करण जमलं नाही; संधीसाधू शिवसेना टीपू सुलतानचा उद्घोष करतेय-केशव उपाध्ये

Published On: 

औरंगाबाद: ‘औरंगाबादच संभाजीनगर करण जमत नाही हिंदुत्व फक्त गप्पापुरतं राहिल, १९७० मध्ये मुस्लिमलीग सोबत गेले आता टीपू सुलतान उद्घघोष करत आहेत’ भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye)यांनी औरंगाबाद-संभाजीनगर नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर कशाप्रकारे टीका करत चांगलाच टोला लगावला आहे. नुकतेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला घेरले होते. आता उपाध्येंनी देखील चारोळीच्या रूपात ट्विट शेअर करत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

औरंगाबाद की संभाजीनगर हा वाद गेल्या ३० वर्षांपासून गाजतांना दिसून येत आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात नेमके तेव्हाच हा मुद्दा शिवसेना-भाजप कडुन तापवला जातो. शिवसेनेने संभाजीनगरची हाक दिली होती. सत्तेत आल्यानंतर संभाजीनगर नामांतर करणार असे शिवसेनेने सांगितले होते. परंतु याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाहीये.

दुसरीकडे शासकीय पातळीवर अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. याच संभाजीनगरच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले होते. तुम्ही साधे औरंगाबादचे संभाजीनगर करून दाखवले नाही. शिवसेनेने बोलण्या व्यतिरिक्त काय करून दाखवले. असा खोचक टोला देवेंद्र फडणीसांनी शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला होता. आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.

काय म्हणाले केशव उपाध्ये?

ही संधीसाधू सेना काँग्रेसने जन्माला घातली आहे. जी आता मुस्लिम लीगच्या मांडीवर बसली आहे. शिवसेना काँग्रेससोबत रमली, काँग्रेसशी त्यांनी दोस्ती केली, पीएसपीशी गाठ बांधली, आणि सारे फसल्यावर हिंदुत्वाचा घोष करीत भाजपसोबत आली. आधी पाग्या होता, आता तोच वाघ्या झालेला आहे. मात्र मूळ स्वभाव काही जात नाही. औरंगाबादचे संभाजीनगर करणे जमत नाही
हिंदुत्व फक्त गप्पापुरते राहिल्याची टिका करत असतांनाच १९७० मध्ये मुस्लिमलीग सोबत गेले आता टीपू सुलतानचा उद्घघोष करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!