कानपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्यास सुरुवात केली आहे. कानपूरच्या किडवाई नगरमधील भाजप आमदार महेश त्रिवेदी(Mahesh Trivedi) हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. जे लोक अत्याचारी आहेत, त्यांना लाठ्या-चप्पलने मारहाण करा, फक्त गोळी मारू नका, बाकी सर्व बघू, असा सल्ला महेश त्रिवेदी यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
त्रिवेदी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये ते म्हणाले आहेत की,’जे लोक बळाचा दुरुपयोग करतील त्यांना जशास तसे उत्तर द्या. त्यांच्यावर लाठ्या-काठ्या चालवा. त्यांना चपलांनी मारा. हे करताना फक्त गोळी चालवू नका मग बाकीची चिंता तुम्ही करण्याचे कारण नाही, ते माझ्यावर सोडा. पुढे काय होईल ते मी पाहून घेईन’, असे ते म्हणाले आहेत.
दरम्यान, ज्यादिवशी कानपूर देहात ते कानपूर नगरपर्यंत एकही व्यक्ती आपल्यामुळे रडताना दिसेल, मग तो हिंदू असो वा मुस्लिम, त्यादिवशी मी समाजसेवेचा राजीनामा देईल. तसेच राजकारण हा दलालीचा, धर्माचा आणि राजकारणाचा मार्ग नाही, आपण कल्याणाच्या भावनेने काम करत आहोत. म्हणूनच तुम्ही खंबीर असले पाहिजे, असेही त्रिवेदी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
“डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले”
“एका महान व्यक्तीच्या नावाचा विरोध भाजप करत आहे”, ‘त्या’ घटनेवरून नवाब मलिकांनी भाजपला सुनावले
“ट्विटरला मोहरा बनू देऊ नका…”, राहुल गांधींचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

