मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांना दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने नोटीस पाठवली होती. यापार्श्वभूमीवरच आता किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंत्रालयाला दिले आहेत. पण मुख्यमंत्रीसाहेब मी वाट पाहतोय की मंत्रालयात माहिती अधिकाराच्या अवलोकनासाठी गेलेल्या किरीट सोमय्यावर तुम्ही गुन्हा कधी दाखल करता ते. तुम्ही दिलेले आदेश मंत्रालय पाळत नाही. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंना आव्हान आहे की तुमच्यात हिम्मत असेल तर एफआयआर दाखल करा”, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगतात. दोष काय तर मी खुर्चीवर बसलो. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहे. उद्धव ठाकरे जे खोटं बोलले ती चोरी मी पकडली, त्याचा राग त्या कर्मचाऱ्यांवर ते काढत आहेत. एका गरीब टायपिस्ट लिपीकाला तुम्ही नोटीस देत आहात. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री बघा. राजकीय भ्रष्टाचार तुम्ही करत आहात. लढाई करायची तर माझ्याशी करा, माझ्यावर कारवाई करा, त्या गरीब लिपीकाला नोटीस पाठवताना मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे”, असा संताप किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.
तसेच ‘मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मी कागदपत्रांची पडताळणी केली आहे. ग्रामविकास मंत्रालय तसेच इतर ठिकाणी त्यांनी केलेली कागदपत्रांची पडताळणी करून आलो, या सर्व ठिकाणी मला खुर्ची देण्यात आली होती, आता या सर्वांना तुम्ही नोटीस पाठवणार का’, असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- साऊथचा सुपरस्टार नागार्जुनने सुनेच्या घटस्फोटावर सोडले मौन, म्हणाला “समांथाला नागा चैतन्यकडून…”
- नितेश राणेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन
- नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील निकालानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- औरंगाबाद होणार ‘कचरामुक्त’; महापालिकेने केले नव्या प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन!
- मालेगावात काँग्रेसला जोर का झटका; २८ नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश


