🕒 1 min read
मुंबई: मुंबई महापालिका नागरिकांना सर्वाधिक सुविधा देत असते. पण जरा कुठं खुट्टं झालं की लगेच महापालिकेला दुषणं दिली जातात. महापालिका काय करते? असा सवाल केला जातो. प्रश्नांचा भडिमार केला जातो. प्रश्न विचारा. प्रश्न विचारणं सोपं असतं. त्याला अक्कल लागत नाही. असे खडेबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना सुनावले आहे.
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आभासी माध्यमातून त्यांनी मुंबईपालिकेचे आयुक्त, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली. कोरोना काळात मुंबई महापालिकेने प्रचंड काम केलं. त्याचं कुणी घरच्यांनी आपलं कौतुक केलं नाही. थेट न्यूयॉर्कने आणि सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो. कौतुक किती होईल याची मला चिंता नाही. दुषणं देणारे अनेक आहे. आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडलं जातं. नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणं दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगळं ठिक आहे. पण तू काय करतो हे सांग? असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
myBMC Assist WhatsApp Chatbot Launch – LIVE https://t.co/3znmxenH8o
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 14, 2022
तसेच कोरोनाने आपली जीवनशैली पूर्णतः बदलून टाकली आहे. कोरोनामुळे गर्दी न करता वर्क फ्रॉम होम करायला सर्वाना भाग पडलं. आपला देश मोबाईल फोन वापरण्यात एक नंबर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो पण त्या प्रमाणात काम होतं का? व्हॉट्सअॅपचा उपयोग आपण कशाला करतोय? उपयोग आणि दुरुपयोग याचा फरक जाणून घ्या. हे तंत्रज्ञान समजून घ्या. तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्यांना व्हायला पाहिजे. नाही तर तंत्रज्ञान फुकट जाईल. असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा?”, मनसेचा इशारा
- राज ठाकरेंच्या सल्ल्यावर संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले,‘कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना…’
- पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर राऊतांचे भाष्य; म्हणाले,‘कधी काळी पंतप्रधानही…’
- “चंद्रकांत पाटलांनी उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं”, राऊतांचा हल्लाबोल
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
