औरंगाबाद:औरंगाबाद स्मार्ट सिटीने शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यासाठी आणि शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत मेट्रो रेल्वे आणि फ्लायओव्हरसाठी एकत्रित डीपीआर तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (महा मेट्रो) नेमले आहे. आज संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर महामीटर कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड(Dr. Bhagwat Karad) यांनी औरंगाबाद स्मार्ट सिटी, महामेट्रो आणि नॅशनल हायवे अॉथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI)अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
हा आराखडा तयार झाल्यानंतर प्रकल्पाच्या निधीबाबत चर्चा करण्यासाठी डॉ. कराड हे केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या भेटी घेणार आहेत. यांच्यासह औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय परिवहन मंत्र्यांना जालना रोडवरील फ्लायओव्हरसाठी पत्र लिहिले होते.
त्यांच्यासोबत चर्चा होणार आहे. मेट्रो रेल्वेबाबत महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना सादरीकरण दिले. महा मेट्रो ही भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारची संयुक्त मालकीची कंपनी आहे जी नागपूर, पुणे आणि नाशिक येथे मेट्रो रेल्वे प्रकल्प राबवत आहे. या सादरीकरणामध्ये विविध शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांबद्दल, मेट्रो रेल्वेच्या विविध मॉडेल्सबद्दल, निधीची आवश्यकता आणि निधी मॉडेल्सबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली होती.
औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ पाण्डेय म्हणाले की, औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शेंद्रा डीएमआयसी ते वाळूजपर्यंत मेट्रो रेल्वे आणि फ्लायओव्हरसाठी सीएमपी आणि एकत्रित डीपीआर तयार करण्यासाठी महा मेट्रोला कार्यादेश जारी करण्यात येतील. “सीएमपी आणि डीपीआर तयार करण्यासाठी ८ ते ९ महिन्यांचा कालावधी लागेल, जो या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट टप्पे निश्चित करेल. निधीचे पर्याय केंद्र आणि राज्य सरकारमधील विविध मंत्रालयांना प्रस्तावित केले जातील, जे पुढील मार्ग ठरवतील. असेही पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र
- “कोरोना सहा महिन्यासाठी कुठे जातो आणि परत कुठून येतो”; करुणा मुंडेंचा ठाकरे सरकारला सवाल
- मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे- चंद्रकांत पाटील
- “चित्रा वाघ फक्त पब्लिसिटी स्टंट करतात”; करुणा मुंडेंचे टीकास्त्र
- सुजेन खानसोबतच्या रिलेशनशीपवर काय म्हणाला अर्सलन गोनी, जाणून घ्या…


