🕒 1 min read
मुंबई : संसदेतील १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येत संसदेसमोर ठिय्या सुरु केला आहे. मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी या नेत्यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर राहुल गांधींनी संसद भवन परिसरातील गांधी पुतळ्याजवळील जागेत खूली पत्रकार परिषद घेतली. हा फोटो महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र काँग्रेस ट्विटर हँडलवरुन हा फोटो ट्विट करत, ‘अशी एकदा पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न करा मोदीजी, घाबरु नका’, असा टोला मोदींना लगवला आहे.
अशी एकदा पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न करा मोदीजी ,घाबरु नका…. pic.twitter.com/rrDhvnvz9D
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 14, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत एकदाही अशी खूली पत्रकार परिषद घेतली नाही, त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांतून प्रचंड टीका होत आहे. देशातील अनेक प्रश्न गंभीर असतानादेखील मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत, केवळ ‘मन की बात’ या कार्यक्रमातून रेडिओद्वारे एकतर्फी संवाद साधतात. त्यांनीही जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, अशी मागणी विरोधकांतून होत आहे.
संसद भवन परिसरातील आंदोलनात निलंबीत खासदार, खा. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेता रंजन चौधरी, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.
हे आहेत निलंबीत खासदार
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना खासदार अनिल देसाई, काँग्रेस खासदार फुलो देवी नेताम, काँग्रेस छाया वर्मा, काँग्रेस खासदार रिपुन बोरा, काँग्रेस खासदार राजामणि पटेल, काँग्रेस खासदार सैय्यद नासिर हुसेन, काँग्रेस खासदार अखिलेश प्रसाद सिंह, सीपीएम खासदार एलामरम करिम, तृणमूल काँग्रेस खासदार डोला सेन, तृणमूल काँग्रेस खासदार शांता छत्री, सीपीआई खासदार बिनय विश्वम इत्यादी खासदारांचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- ”त्या’ विद्यार्थ्याला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या खुनी सरकारवर ३०२ दाखल करा’
- ‘…चे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल’, शिवसेनेकडून मोदींचे कौतुक
- ‘ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली त्याच गंगेत हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
