Share

‘जब गंगा में, तैर रही थी लाश। तब मोदी जी क्यूँ ना आये, माँ गंगा के पास’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काशी यात्रेला गेले होते. तीथे त्यांनी जलपूजन केले. त्यांची ही काशी यात्रा चांगलीच गाजली आहे. काशी यात्रेदरम्यान गंगेत डुबकी मारल्याचे छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. वाराणसीच्या घाटात डुबकी घेत त्यांनी जलपूजन केले होते. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे.

नाना पटोले ट्विट करत म्हणाले, ‘जब गंगा में, तैर रही थी लाश। तब मोदी जी क्यूँ ना आये, माँ गंगा के पास’, असा टोला नाना पटोलेंनी मोदींना लगावला आहे.

यावर शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनीही मोदींना आग्रलेखातून चिमटा काढला आहे. संजय राऊत म्हणाले, मोदी हे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांचे गंगास्नान प्रकाशझोतात राहिले. नाहीतर गंगेत रोज लाखो लोक डुबक्या मारीतच असतात. राहुल गांधी म्हणतात तेच खरे. इतके लोक गंगेत स्नान करतात, पण कॅमेरा फक्त मोदींवरच असतो. हा कॅमेरा व्यक्तीवर नसून पंतप्रधानांवर आहे. पाहू, काशी विश्वनाथाच्या मनात काय आहे? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान ज्या गंगेच्या पात्रात पंतप्रधान मोदी यांनी डुबकी मारली त्याच गंगेत कोरोना काळात हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले. पंतप्रधान म्हणून नव्हे, तर काशीचे खासदार म्हणून मोदी यांनी त्या वेळी तेथे जायला हवे होते. मोदी आजच्या झगमगाटी वातावरणात तेथे गेले, पण गंगा आक्रोश करीत असताना काशीचे खासदार तेथे गेले नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी काशीत जाऊन गंगेत स्नान केले. त्या गंगास्नानाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत. विरोधकांविषयीची किल्मिषे नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार होवो अशी आशाही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!