Share

आंध्रप्रदेश, केरळ आणि तेलंगणाला भाजपचा बालेकिल्ला बनवा : अमित शाह

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी हैदराबादमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आंध्र प्रदेश, केरळ आणि तेलंगणाला भाजपचा बालेकिल्ला बनवायचा आहे. त्यासाठी मेहनत घ्या असं आवाहन केले आहे.

अमित शाह यांनी दक्षिणी राज्य हा भाजपाचा गड बनेल, त्या दिशेनं काम करा. कर्नाटकमध्ये आम्ही सरकार बनवलं होतं, तरीही म्हटलं जातं भाजपा दक्षिणेत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की, तेलंगणा, आंध्र प्रदेश असो वा केरळ, या तिन्ही राज्यांना एक दिवस भाजपाचा गड बनवावा लागेल. या राज्यांतील ५० टक्क्यांहून अधिक मतं भाजपच्या पारड्यात पडायला हवी आहेत असं आवाहन त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत दाक्षिणात्य राज्यांत भाजपला म्हणावे असे यश मिळालेले नाही. त्यामुळे दक्षिण भारतासह संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या सदस्य जोडणी अभियानाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात केली. या अभियानामार्फत देशातील वेगवेगळ्या राज्यांत पक्षसंघटना मजबूत करण्याचा हेतू आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!