🕒 1 min read
मुंबई: राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय ‘खेळ’ म्हणावा लागेल अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. हिंदुस्थानने ती परंपरा व संस्कृती गमावली आहे. अशी टीका सामनातून केंद्रावर करण्यात आली आहे.
सध्या देशाचे वातावरण खेळमय झाले आहे. एरव्ही ते क्रिकेटमय झालेले दिसते. टोकियो ऑलिम्पिकमुळे देशात इतर खेळांवर उत्साहाने चर्चा होत असताना निरज चोप्रा याने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. या सुवर्ण क्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने राजकीय खेळ केला. या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. 1991-92 सालापासून राजीव गांधींच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. अनेक महान खेळाडूंना आतापर्यंत हा पुरस्कार प्रदान केला गेला, पण राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असे यापैकी कोणीही म्हटल्याचे दिसत नाही. अशी टीका करत संजय राऊत यांनी केंद्रावर निशाना साधला आहे.
ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसे झाले असते तर मोदी सरकारची वाहवाच झाली असती. आता भाजपमधील राजकीय खिलाडी असे सांगत आहेत की, ‘राजीव गांधी यांनी कधी हातात हॉकीचा दांडा धरला होता काय?’ हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे, पण अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदींच्या नावाने केले. मग श्री. मोदी यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी पार पाडली? असा सवाल करत त्यांनी मोदी सरकार आज ऑलिम्पिक पदकांचा उत्सव साजरा करीत आहे, पण मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत ‘ऑलिम्पिक’चे बजेटच साधारण तीनशे कोटींनी कापले. हिंदुस्थानी महिला-पुरुष हॉकी संघाचे प्रायोजकत्व ‘सहारा’ने काढून घेतल्यावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दोन्ही हॉकी संघांचे पालकत्व स्वीकारले. त्यामुळे ‘हॉकी’ यशाचे श्रेय जसे त्या संघाच्या मेहनतीस तितकेच ते ओडिशाच्या नवीन बाबूंचे आहे. असे म्हटले आहे. पी. व्ही. सिंधू हिने तर सलग दुसऱयांदा ऑलिम्पिक पदक जिंकले. महाराष्ट्राचे खाशाबा जाधव यांचे कर्तृत्वही मोठेच आहे. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकणारे ते महान पुस्तीपटू होते. ऑलिम्पिकमध्ये आपल्या कुस्तीगीरांनी पदके जिंकली तेव्हा खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार व्हावा, असा सूज्ञ विचार कुणाच्या मनात का येऊ नये? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाशिकरांनो सावधान ! एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण
- भाजपची सत्ता पुणे महापालिकेमध्ये असल्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार दुजाभाव करतंय ?
- ‘खेलरत्नचे नाव बदलले, आता पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन जनतेची ही मागणी देखील पूर्ण करा’
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- विद्यार्थ्यांचे ना लसीकरण, ना लोकल प्रवासास मुभा; मग सीईटी परीक्षा कशी घेणार ? : उच्च न्यायालय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
