Share

युवराजची बॅट पुन्हा तळपली; पुन्हा केली षटकांराची बरसात

Published On: 

🕒 1 min read

रायपुर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या उपांत्य सामन्यात भारताने १२ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यातील भारताच्या डावात भारताचा सिक्सर किंग युवराजची बॅट पुन्हा तळपली. बुधवारी झालेल्या सामन्यात युवराजने २० चेंडूत ४९ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने गगनचुंबी षटकांराची बरसात केली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने चांगली सुरुवात करुन दिली. सचिनने यावेळी ४२ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ६५ धावा केल्या. मात्र सचिन बाद झाला आणि युवराज मैदानात आला. युवराजने तुफान फटकेबाजी करत यावेळी फक्त २० चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावांची खेळी साकारली. युवराजच्या या वादळी खेळीमध्ये सहा षटकारांचा समावेश होता. युवराजने फक्त १० चेंडूंमध्ये हे सहा षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले.

या षटकारांनी युवराजच्या चाहत्यांना पहिल्या टी-२० सामन्याची आठवण करुन दिली. त्या सामन्यात युवराजने एकाच षटकात तब्बल चार षटकार लगावले होते . यापूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही दमदार फलंदाजी करत युवराजने षटकारांची बरसात केल्याचे पाहायला मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराजने एकाच षटकात सहा षटकार खेचले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!