🕒 1 min read
Do not judge book by its cover ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल आणि अशीच चूक कारच्या शोरूमच्या एका सेल्समनने केली होती. एक शेतकरी आपल्या मित्रांसह कार शोरूममध्ये पोहोचला आणि तेथे स्वत:साठी कार बघू लागला. शेतकऱ्याचे कपडे बघून हा कोणती गाडी घेणार?, असा विचार सेल्समनने केला आणि त्याचा अपमान करत तुझ्या खिशात १० रुपये तरी आहेत का?, असा सवाल केला. त्यानंतर अपमानित झालेल्या शेतकऱ्याने ३० मिनिटांत सेल्समनला आपली औकात दाखवली.
हे प्रकरण कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील आहे. चिक्कासांद्र हुबळी येथील रमणपल्या येथील शेतकरी केम्पेगौडा आरएल शुक्रवारी कार खरेदी करण्यासाठी महिंद्राच्या शोरूममध्ये गेले होते. त्यांच्यासोबत काही मित्रही होते. त्यांनी महिंद्रा बोलेरो एसयूव्हीची चौकशी केली. शोरूमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हने त्याच्या कपड्यांकडे निरखून पाहिले. त्याला ते साधे वाटले. हे लोक फक्त टाईमपास करायला आसल्याचा निकर्ष त्याने लावला. सेल्समनने त्यांची चेष्टा केली आणि १० रुपये खिशात नसल्याचे सांगून १० लाखांची कार घेण्यासाठी आल्याचे म्हणत चेष्टा केली.
मग काय, पेशाने सुपारी उत्पादक शेतकरी असलेल्या केम्पेगौडा आणि त्यांच्या मित्रांना ही चेष्ठा लांगलीच जिव्हारी आली. त्यांनी सेल्समनला चॅलेंज केले की, जर लगेच पैसे दिले तर आजच गाडी डिलिव्हरी होईल का?. केम्पेगौडा यांच्या म्हणण्यानुसार, आज बँका बंद असल्याने आणि उद्या शनिवार आणि रविवार असल्याने हे लोक इतक्या लवकर पैशांची व्यवस्था कशी करू शकतील, असा विचार करत सेल्समनने आव्हान स्विकारले.
३० मिनिटांत १० लाख रुपये रोख सेल्समनला दिले
केम्पेगौडा आणि त्यांचे मित्र शोरूममधून निघून गेले आणि ३० मिनिटांत १० लाख रुपये रोख घेऊन सेल्समनला दिले. या प्रकरणाची माहिती मिळताच शोरूममध्ये काम करणारे बाकीचे लोकही जमा झाले. सगळेच थक्क झाले. यानंतर केम्पेगौडा यांनी एसयूव्ही डिलिव्हरी करण्यास सांगितले. मात्र सेल्समन नाराज झाले होते. ते कार डिलिव्हरी करू शकले नाहीत. शनिवार-रविवार सरकारी सुट्टी होती. गाडीच्या डिलिव्हरीसाठी त्यांनी तीन दिवसांचा अवधी मागितला.
अपमानाचा घेतला बदला
त्यानंतर केम्पेगौडा आणि त्यांच्या मित्रांनी अपमानाचा बदला घेत शोरुमध्ये गोंधळ घातला. बरीच गर्दी जमली होती. काम्पेगौडा यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात शोरूमविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी येऊन सर्वांना समजावून सांगितले. शोरूमच्या वतीने केम्पेगौडा यांची माफी मागितली गेली. लेखी माफीनामा दिला, मग प्रकरण कुठेतरी मिटले.
महत्वाच्या बातम्या:
- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणाला, ‘जय श्री राम’
- तुमचं लग्न कधी होणार? म्हणाऱ्या नेटकऱ्यांना सोनाक्षीने दिलं ‘हे’ उत्तर
- Good News : आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन
- भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना ठरली आयसीसी २०२१ “वूमन क्रिकेटर ऑफ द ईयर “
- मी काय आणि कोण हे सलमानला वेळ आल्यावर दाखवून देईन-अभिजीत बिचुकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
