Share

भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना ठरली आयसीसी २०२१ “वूमन क्रिकेटर ऑफ द ईयर “

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आयसीसीच्या टी ट्वेंटी वूमन टीम ऑफ द ईयरमध्ये समावेश झाल्यानंतर आता स्मृती मंधना हिला “रेचल हेहो फ्लिंट ट्रॉफीसाठी आयसीसी २०२१ वूमन क्रिकेटर ऑफ द ईयर ” म्हणून घोषित केले आहे. २०२१ मध्ये तिने केलेल्या दमदार खेळी केली होती. स्मृतीला २०१८ मध्येही या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.

२०२१ मध्ये झालेल्या २२ सामन्यात स्मृतीने ३८.८६ च्या सरासरीने ८५५ धावा केल्या. ज्यात ५ अर्धशतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्याच पिंक बॉल टेस्टमध्ये धडाकेबाज कामगिरी करत केलेल्या शतकाचा समावेश आहे. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी २०२१ हे वर्ष कठीण गेले. मात्र स्मृतीच्या खेळीने संघाला दिलासा दिला आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत भारताने आठ पैकी फक्त दोन सामने जिंकले होते. त्या दोन्ही सामन्यात विजयाची शिलेदार स्मृतीच ठरली होती. १५८ धावांचा पाठलाग करताना तिने ८० धावांची नाबाद खेळी सुद्धा केली होती. यासोबतच शेवटच्या टी-२० सामन्यात ४८ धावांची नाबाद खेळी करत विजय मिळवून दिला होता.

आयसीसी वूमन क्रिकेटर ऑफ द ईयर दुसऱ्यांदा जिंकण्याआधी स्मृती मंधानाला टॅमी ब्युमॉन्ट ऑफ इंग्लंड, लिझेल ली ऑफ साउथ आफ्रिका आणि गॅबी ल्युवीस ऑफ आयर्लंड या पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!