Share

औरंगाबाद जिल्ह्यात महिला राज

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील ढाकेफळ गावात नारीशक्तीचा प्रभाव दिसून आलाय. ढाकेफळ गावातील 9 पैकी 9 जागांवर फक्त महिलाच विजयी झाल्या आहेत. गावकऱ्यांनी निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणात संधी दिली होती. त्याचा परिणाम म्हणुन हा विक्रम पहायला मिळाला आहे.

तर सिल्लोड तालुक्यातील लिहा खेडी येथील ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली असून नऊपैकी सात जागांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजय मिळविला आहे. यात विजयी उमेदवार अनिता नामदेव साखळे, कृष्णा समाधान साखळे, अर्चना पोपट साखळे, कविता सिताराम गोरे, रुपेश माणिकलाल जयस्वाल, सुभद्रा गजानन जाधव, पूजा प्रकाश साखळे, यापूर्वीच बिनविरोध झालेल्या प्रियांका मनोज साखळे या8 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेत. तर विरोधी रेणुका गजानन बावस्कर या विजयी झाल्यात.

दरम्यान, कन्नडमध्ये शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. भाजपच्या नितीन पाटील यांच्या पॅनलचा 15 पैकी 8 जागांवर विजय झाला आहे तर शिवसेनेला केवळ 4 जागा जिंकण्यात यश मिळवलं आहे.

हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!