Share

जाणून-बुजून अध्यक्षपदाबाबत पवारांच्या नावाने खोट्या बातम्या पेरल्याचा राष्ट्रवादीला संशय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे.

गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे  म्हणाले, यूपीएच्या प्रमुख पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची नियुक्ती होणार अशा आशियाच्या चुकीच्या बातम्या काल दिवसभर वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छिते कि यूपीए मधील घटक पक्षांमध्ये अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव नाही व कुठली चर्चा देखील झालेली नाही.

महेश  तपासे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असा संशय आहे की जाणून-बुजून काही लोकांनी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या मीडियामध्ये पेरून केंद्र सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाच्या बाबत जो तीव्र शेतकरी आंदोलन आहे त्याच्यावरून जनतेचे लक्ष विचलित व्हावं असा काही प्रयत्न ह्या बाबतीत झाला आहे.

दरम्यान, हे वृत्त पसरताच राज्यातील विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्रात भाजपला चकवा देत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात शरद पवार यांच्यासोबतच महत्वाचा वाटा असलेले शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील या विषयावर भाष्य केलं आहे.

‘राष्ट्राचे नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या कोणामध्ये असेल तर ती शरद पवार साहेबांमध्ये आहे.’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. यासोबतच, ‘भविष्यात राष्ट्रीय राजकारणात काय होईल हे मी सांगू शकत नाही. मात्र, देशभरातील विरोधकांची इच्छा आहे महाराष्ट्रातील प्रयोग भविष्यात देशपातळीवर करावे’ असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!