🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. तसेच मलिकांनी एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले. याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले आहेत.
नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली, असा दावाही त्यांनी केलाय.
यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘बॉम्ब ब्लास्टमध्ये ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले, त्यांच्या कुटुंबीयांशी, महाराष्ट्राच्या जनतेशी, मराठी माणसाशी या सरकारने केलेला हा विश्वासघात आहे. देशवासियांच्या पाठीत महाविकास आघाडीकडून खंजीर खुपसला गेलाय. महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ! अशी टीका वाघ यांनी केली आहे.
बॅाम्ब ब्लास्ट मध्ये ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले
त्यांच्या कुटुंबीयांशी..
महाराष्ट्राच्या जनतेशी..
मराठी माणसाशी..या सरकारं केलेला हा विश्वासघात आहे.देशवासियांच्या पाठीत #MVA कडून खंजीर खुपसला गेलाय.
महाविकास आघाडी का हाथ
अंडरवर्ल्ड के साथ ! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 9, 2021
तसेच १९९३ बॅाम्ब ब्लास्टमधील आरोपींच्या मित्रांशी मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत. सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असे ट्विटही चित्रा वाघ यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांना आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू- नवाब मलिक
- ‘माझ्या मंत्रिमंडळातील कोणत्याच मंत्र्यांला हिंदी कळत नाही’, मुख्यमंत्र्यांचे अमित शहांना पत्र
- ‘पप्पांना मृत्यू आधीच दिसला होता का?’ आर.आर.पाटलांच्या मुलीची भावूक पोस्ट
- ‘सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची इतिहासात नोंद होईल’
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

