Share

‘सत्तेचे लचके तोडण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली त्यामुळे एकमेकांचे लचके तोड अशी त्यांची अवस्था’

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे. सत्तेचे लचके तोडण्यासाठी महाविकास आघाडी तयार तसे नाही झाले तर एकमेकांचे लचके तोड अशी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे. प्रत्येकजण सरदार असल्यासारखा वागत आहे. अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही पक्ष आंदोलन करुन राजकारण करत असल्याची टीका केली होती. यावरच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगण्यापेक्षा सोबतच्या मंत्र्यांना अगोदर बोलयचं शिकवावं’ अशी टीका केली आहे. अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको. असे वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरेंनी केले होते. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

यावेळी त्यांनी करुणा शर्मा पिस्तूल प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली आहे. त्या ठिकाणी जे काही घडलं आहे त्यावरुन कायदा-सुव्यवस्था कशी राखली जात आहे हे स्पष्ट होत आहे. जे आरोप प्रत्युत्तर होत आहेत आणि मिळालेलं पिस्तूल हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबाबाशिवाय चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!