Share

महाविकास आघाडीचे मंत्री आमने-सामने; बच्चु कडूंच्या ‘प्रहारा’वर कृषीमंत्री दादा भुसेंचे प्रत्युत्तर

Published On: 

अमरावती : कोरोना रोगाचा फटका, दूध दरवाढ मिळत नसल्याने आर्थिक तोटा, बोगस बियाणं, वादळ, मान्सून, कीड, खतांसाठी करावा लागणार खटाटोप अशा सर्वच प्रतिकूल परिस्थितीतुन शेतकऱ्यांना जावं लागत आहे. यावरूनच आता राज्यमंत्री बच्चु कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

बच्चु कडू यांनी, ‘ ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करुन पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे,’ असे सांगितले. तर, पुढं त्यांनी शेतकऱ्यांच्या सद्याच्या परिस्थितीवरून सरकारलाच खडेबोल सुनावले. “राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय?” असा घणाघातच त्यांनी केला आहे.

सोमवारी काँग्रेसच्या कार्यसमितीची महत्वाची बैठक ; सोनिया गांधी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवणार?

राज्यमंत्री बच्चु कडू यांनी केलेल्या आरोपांवर आता कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कृषी विभाग हे शेतकऱ्यांच्या प्रति गंभीर नाही, अशी कोणतीही परिस्थिती नाही. ज्या गोष्टी गोष्टी समोर येत असतात त्याचा निपटारा करण्याचे काम हे कृषी विभागाकडून केले जात आहे’, असा खुलासा भुसेंनी केला आहे.पूढे त्यांनी, ‘राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या काही ज्या सूचना आहे. त्यांचा विचार केला जाईल. बच्चू कडू यांनी  जे आरोप केले त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असंही स्पष्ट केले.

राज्य सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे –  जयंत पाटील

दरम्यान, राज्यमंत्री बच्चु कडूंनी महाविकास आघाडीच्या कृषी खात्यावर केलेल्या टीकेमुळे कृषीमंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधत प्रहार केला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, विदर्भात सर्वाधिक सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र, बोगस बियाणांमुळे पीक उगवलंच नाही, आणि जे उगवलं ते वाढलच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुशांतसिंह प्रकरणात राज्य सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला – राधाकृष्ण विखे

यातच अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा नाहीच!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!