🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता.परंतू सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने सुरु केला आहे.यातून खरे सत्य निश्चित समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणेशाची स्थापना केल्यानंतर आ.विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शाळा उघडण्यापासून ते महाविद्यालयांच्या परिक्षा घ्यायच्या की नाही याबाबत सरकारकडे स्वतःची भूमिका नसल्याने सरकार गोंधळलेल्या अवस्थेत काम करीत आहे असे त्यांनी म्हटले.शेतकरी दूध उत्पादकांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर येवून आंदोलन करतात पण सरकार जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची टिका आ.विखे यांनी केली.
कोव्हीड १९ संकटातही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही. शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला काहींना फेकून द्यावा लागला सरकार नावाची व्यवस्था कोणत्याच संकटात शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसाला मदत करू शकलेली नसल्याची खंत आ.विखे यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या –
राज्यासह परराज्यांत प्रवासासाठी ‘ई-पास’ची गरज नाही : केंद्र सरकार
राज्य सरकारचा तुकाराम मुंढेच्या ‘त्या’ नियमाबाबत व्यापाऱ्यांना दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

