Share

राज्य सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे –  जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- कोरोना आणि लॉकडाऊने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम घडून आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली ती शेतमालाची निर्यात आणि खरेदी-विक्री. यामध्ये ऐन कापूस विक्रीच्या तोंडावर लॉक डाऊन सुरू झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला दिसून आला.

मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी पावसाळा तोंडावर येई पर्यंत शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर गर्दी केली होती. तर अनेक ठिकाणी खरेदीचे उदिष्ट पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागल्याच दिसून आले.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी कापूस पणन महासंघाच्या अडचणी संदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे पणन मंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचं सांगितल तर यावर्षी गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली असून, महासंघासमोरील कापूस खरेदी संदर्भातील सर्व अडचणी सोडवून उपाययोजना करण्यात येतील तसेच यासाठी ‘दी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत (सी सी आय) ची बैठक देखील घेण्यात येईल. जेणे करुन पुढील हंगामात मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करावी लागल्यासअडचणी येणार नाही.असे आश्वासन त्यांनी यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!