🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोरी प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती, तर अनेक दिग्गजांनाही या रोगाचा सामना करावा लागला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तर, आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते.
सुशांतसिंह प्रकरणात राज्य सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला – राधाकृष्ण विखे
रुग्णालयाने काही वेळापूर्वीच नवे मेडिकल जाहीर केले असून अजूनही प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा नसल्याचे यात सांगण्यात आले आहे. मेडिकल बुलेटिननुसार, ” माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीमध्ये कोणताही फरक जाणवत नाही. ते अजूनही डीप कोमा मध्ये असून व्हेंटिलेटर सहाय्यावर आहेत.”
मोठी बातमी : देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३० लाख पार!
There is no change in the condition of former President Pranab Mukherjee this morning. He remains in deep coma and on ventilator support. His vital parameters are stable: Army Hospital (Research and Referral), Delhi Cantonment pic.twitter.com/zLaiOdpEHP
— ANI (@ANI) August 23, 2020
रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की त्याच्या मेंदूत एक मोठी गाठ आहे, ज्यासाठी त्यांनी आपत्कालीन व्हेंटिलेटर सहाय्याने शस्त्रक्रिया केली. पण या शस्त्रक्रियेनंतरही प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर आहे.डॉक्टरांची विशेष टीम सतत माजी राष्ट्रपतींच्या आरोग्याची काळजी घेत आहे. गेले अनेक दिवस माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे व्हेंटिलेटर सहाय्यावर आहेत. तर, त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे.
“राज्यातील कृषी खात झोपलं आहे का?” राज्यमंत्री बच्चु कडूंचा सरकारला घरचा आहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

