Share

‘महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्वतःच्या खुर्च्या उबविण्यातच जास्त रस आहे’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

Published On: 

धुळे : मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. ऐन काढणीवेळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय. अशावेळी सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी करत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारने पंचनामे झाल्याशिवाय मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचारासाठी चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

‘तिन्ही पक्षातील नेते एकमेकांना सल्ले देताना दिसतात. ते सल्ले राज्यासाठी महत्त्वाचे नाहीत. राज्यात पूरपरिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे हाल होत आहे. युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत. आघाडी सरकारने लोकांना वेगवेगळे वादे केले होते. त्याचा महाविकास आघाडी सरकारला विसर पडलेला आहे’.

राज्याचे विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे आज नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेलेले आहेत. नुकसानीचे पंचनामे न करता सर्वांना सरसकट मदत द्यावी, अशी आमच्या विरोधी पक्षनेत्यांची मागणी आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना स्वतःच्या खुर्च्या उबविण्यातच अधिक रस आहे, असे विविध घटनांवरुन दिसत आहे, अशी टीकाही वाघ यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!