Share

‘महाविकास आघाडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे’ – प्रवीण दरेकर

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात कॉंग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास सरकार आहे. परंतु कॉंग्रेस सातत्त्याने आगामी निवडणुकींसाठी स्वबळाचा नारा देत असताना दिसत आहे. त्यातच शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनापक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधून बोचरी टीका केली.

तर काल शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं लेटरबॉम्ब समोर आलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सध्या सत्तेत सोबत असलेले मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा खळबळजनक आरोपही प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे.

महाराष्ट्रातील अशा राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच अचानक दिल्ली गाठली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लगावले जात आहेत. हाच धागा पकडून विधानपरिषदेचे प्रवीण दरेकर आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘ महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद आहेच पण पक्षांतर्गत देखील विसंवाद असल्याचे दिसून येत आहे.’ अशी टीका त्यांनी केली आहे.

तसेच ‘शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र म्हणजे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत नेमकं काय चाललंय हे दाखवणारे पत्र आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कशाप्रकारे शिवसैनिकांना किंबहुना कार्यकर्त्यांना वागणूक दिली जाते त्यासंदर्भात प्रताप सरनाईक यांचे पत्र असावे,’ असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

‘मविआ मधील विसंवादाची अनेक उदाहरणं देता येतील, असे सांगताना दरेकर म्हणाले, खेड येथे पंचायत समितीचे सभापती शिवसेनेचे असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी अविश्वास दाखवत सत्तेवरून राजकारण केले. त्यावेळेस संजय राऊत यांनी राजकीय वक्तव्ये सुद्धा केली, आमदार राष्ट्रवादीचा असला तरी आम्ही त्यांच्या विरोधात लढू, असे वक्तव्य केले असताना एका बाजूला महाविकास आघाडी घट्ट आहे असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी विरोधात लढू असं सांगायचं. अशा प्रकारच्या दुहेरी भूमिका शिवसेनेकडून घेतल्या जात असल्याचं दिसून येत आहे.’ असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!