औरंगाबाद : मनसेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी जोरात कामाला सुवत करत, महाविकास आघाडी सरकारला दात पडलेल्या वाघाची उपमा दिली. शेतकऱ्यांसाठी महावितरणच्या आंदोलनात सरकारवर हल्ला बोल केला. त्यामुळे आगामी काळात मनसे जोर धरत पक्ष भक्कम करणार असल्याची चर्चा कार्यकर्ते करत आहे.
महावितरण कार्यालयासमोर वीजबील वसुलीसाठी शेतकऱ्यांचा शेतीपंपाचा विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करावा आदी मागण्यांसाठी उपकेंद्रावर आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी उपक्रेंद्रात प्रवेश केला, परंतु वीरगाव पोलिसांनी त्यांना अडविले.
आठ दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी नंदु हिरडे, सरपंच संतोष घंगाळे, स्वप्निल श्रीवास्तव, संदीप वाळूंज, गणेश बर्हाळकर,गोरक तुपे, मनोज लेभे, अशोक चव्हाण, योगेश तुपे, पोपट रक्ताटे आदी उपस्थित होते. वीरगाव पोलिस यावेळी बंदोबस्त देत महावितरण कार्यालयात उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- चंदन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
- #Breaking : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्र्याची करोडो रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- Fact Check : अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळला ?
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

