Share

Chitra Wagh | संजय राठोड यांना क्लीन चिट महाविकास आघाडीने दिली – चित्रा वाघ

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : शिवसेनेतील बंडखोर आमदार संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने विरोधकांकडून टीका होत असताना, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. संजय राठोड यांच्याविरोधात आंदोलन करत राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या चित्रा वाघ यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याने नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं असून संजय राठोड यांनी क्लीन चीट का दिली? अशी विचारणा केली आहे. तसंच पीडित मुलीला न्याय मिळणार असेल, तर आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

संजय राठोड यांच्यावरुन होणाऱ्या टीकेसंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं, “कोण मला चांगलं बोलत आहे, वाईट बोलत आहे याला मी कधीच महत्त्व देत नाही. माझा लढा मी लढणार आहे. मला कोणी निंदावं, कोणी वंदावं यामुळे फरक पडत नाही. ती महाराष्ट्राची मुलगी होती. त्या मुलीसाठी लढणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!