मुंबई : 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. ‘महाराष्ट्र दिन’ हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.
आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, ‘ महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी – सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही’ असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला आणि कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘डॉक्टर व आरोग्य सेवेतील प्रत्येकजण आपल्या प्राणाची पर्वा न करता लढत आहेत. जनता संयमाने शासनाचे नियम पाळत आहेत. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून आपला कणखर महाराष्ट्र पुन्हा मोकळा श्वास घेईल हे नक्की,’ असं जयंत पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच कोरोना विरुध्द लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना जयंत पाटील यांनी आदरांजली वाहिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना संकटाचे भान ठेवून यंदा १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य शासनाने नागरिकांना केले आहे. गेल्या वर्षीही कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा राज्याच्या स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन आहे. पण कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- क्लिन बोल्ड होताच विराटच्या नावे नकोसा विक्रम; सर्वाधिक क्लिन बोल्ड होणाऱ्या फलंदाजाच्या यादीत मिळाले स्थान
- क्लीन बोल्ड करणाऱ्या नवोदीत हरप्रीत ब्रारला भेटायला गेला कोहली; व्हिडीओ व्हायरल
- आज महाराष्ट्राची एकसष्टी; मुख्यमंत्र्यांकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन
- भारतीय संघाचा हुकमी एक्का आर अश्विनच्या कुटुंबात कोरोनाचं थैमान
- महाराष्ट्र दिनी मुंबई इंडियन्स विजयाची पताका फडकवणार का?,आयपीएलमध्ये आज हिटमॅन विरुद्ध चेन्नई एक्सप्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

