Share

महाविकास आघाडीचा भाजपला धोबीपछाड; पदवीधर-शिक्षक निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ

Published On: 

🕒 1 min read

पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला.एक डिसेंबरला या मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर काल (गुरुवार) या निवडणुकांच्या मतमोजणीस सुरुवात झाली होती.

दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून हाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये सतीश चव्हाणांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!