Share

महाराष्ट्राने या परिस्थितीला संयमाने सामोरे जावे- सुनील तटकरे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची संतप्त प्रतिक्रिया आज महाराष्ट्रभर उमटली आहे. जनतेने शांततेच्या मार्गाने आपली भूमिका, संवेदना मांडावी. शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी एकरुप झालेल्या महाराष्ट्राने या परिस्थितीला संयमाने सामोरे जावे, अशी विनंती सुनील तटकरे  यांच्या वतीने करण्यात आली.

महाराष्ट्र बंदला ‘हिंसक’ वळण कोल्हापूरमध्ये पोलिसांना मारहाण

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला झालेल्या दगडफेकीचा निषेध नोंदवण्यासाठी आज उत्स्फूर्तपणे ‘महाराष्ट्र बंद’ पाळण्यात येत आहे. मात्र, शांततेच आवाहन करून सुद्धा या बंदला हिंसक वळण लागल आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात या बंदला मोठा प्रतिसाद मिळत असताना कोल्हापूर शहरातील आर. के. नगर नाक्यावर जमावाकडून तोडफोड करण्यात आली तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने या बंदला हिंसक वळण लागण्याची चिन्हे आहेत. तसच कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून तोडफोडीचे आणि दगडफेकीचे प्रकार होत असल्याने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाचे पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून रस्त्यावर पार्किंगमधील चारचाकी आणि दुचाकी गाड्या यांना लक्ष करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!