Share

महाराष्ट्रातले शिवसेना मंत्री गुजरातमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचाराला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारमध्ये भाजप – शिवसेना दोघेही सत्तेत सहभागी असताना देखील त्यांच्यातून विस्तव जाताना दिसत नाही. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याच चित्र गुजरात विधानसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळत आहेत, गुजरातमध्ये शिवसेनेकडून 47 उमेदवार उभे करण्यात आले आहेत. मात्र अस असल तरीही राज्यातील शिवसेनेचे मंत्री सूरतमध्ये जाऊन भाजप उमेदवाराचा प्रचार करत आहेत.

पुरंदरचे आमदार तथा जलसंवर्धन राज्यमंत्री विजय शिवतारे हे सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार झंखाना पटेल यांच्या प्रचारासाठी गेले होते. झंखाना या भाजपाचे दिवंगत आमदार राजा पटेल यांची मुलगी आहे. दरम्यान या सभेसाठी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजय शिवतारे यांनी ‘ दिवंगत राजाभाई पटेल हे आपले मित्र होते. मुंबईत काहीकाळ आम्ही एकत्र घालवला. तसेच आम्ही दोघांनी राजकारणात एकत्र प्रवेश केल्याच त्यांनी सांगितले. तसेच आपल्या पक्षाकडून आलो नसल्याच सांगायलाही शिवतारे विसरले नाहीत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!