मुंबई : दररोज होत असलेल्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वजन सहन न झाल्याने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सगळेच बैलगाडीवरून खाली कोसळले. काँग्रेसने गॅस, पेट्रोल आणि डिझेलमध्ये दररोज होणाऱ्या दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबईत बैलगाडी मोर्च्याचे आयोजन केले होते. मात्र एकाच वेळी अनेक कार्यकर्ते बैलगाडीत चढल्याने एका क्षणात ते रस्त्यावर पडले.
या घटनेनंतर भाजपकडून सोशल मीडियावर या आंदोलनाची खिल्ली उडवली जात आहे. तर याच मुद्याला धरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. आज नागपुरात पत्रकारांशी त्यांनी सवांद साधला यावेळी ते म्हणाले कि, ‘जर तो प्रसंग नीट पहिला तर राहुल गांधीना राष्ट्रीय नेता म्हणल्याचे बैलांना देखील आवडलेले नाही असे दिसत आहे. त्यामुळे ती बंदी तुटली. पण माझ्या कॉंग्रेसच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत.’ असा खरमरीत टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
त्यानंतर भाई जगताप यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. जगताप म्हणाले की, ‘घरात बसल्यावर अपघात घडत नाही. मामु म्हणजेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील जनतेच्या समस्या काय कळणार. तो एक अपघात होता. राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण पूर्ण होत नाही. यामुळे टीका होत असेल पण जनतेचा पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीविरोधाततला आक्रोश पंतप्रधानांपर्यंत पोहोचला असेल तर त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा.’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.
दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे सामान्य लोक अडचणीत असतानाच भाजप सरकारच्या काळात प्रचंड महागाई वाढल्याने लोकांचे कंबरडे मोडलं आहे. त्यामुळे भाजपने महागाई कमी करावी, या मागणीसाठी काँग्रेस राज्यभर आंदोलन करत आहे. याचाच भाग म्हणून अनेक ठिकाणी सायकल आणि बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध केला जात आहे. आजचा मोर्चाही याचाच एक भाग होता.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला मुंडे समर्थकांचा दणका ; बीडमध्ये भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी दिले राजीनामे
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
- ‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला
- ‘उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या’, खा.ओमराजेंच्या सूचना
- मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला टेम्पोची धडक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला


