टीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाची धूम सुरू आहे. मागच्या आठवड्यात राज्यातील काही भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे. तर काही भागांना पावसाने वीजनच्या कडकडाटासह झोडपलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज देखील राज्यात काही ठिकाणी पावसाची सरी बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
गेले काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेली पिके आता त्यांना त्यांच्या हातातून निसटताना दिसत आहे. सध्या शेतकऱ्यांचा पिक काढणीचा हंगाम सुरू आहे. पण या पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी होत आहे. शेतीतील कापूस, सोयाबीन, हळद, मिरची, ज्वारी या पिकांसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पाऊस
राज्यात गेले काही दिवस मुंबई, पुणेसह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस सुरू होता. त्याचबरोबर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने जोर धरला आहे. यावर्षी नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यात आतापर्यंत 1100mm पाऊस झाला आहे. तर हिंगोली जिल्ह्यालाही पावसाने चांगलचं झोडपलं आहे.
राज्यात दिवाळी पर्यंत पावसाची धूम
गणपती संपले, नवरात्र आणि दसरा सुद्धा झाला, पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे. ऐन दिवाळीत पाऊस कोसळण्याचे चिन्हं आता दिसू लागले आहे. साधारणतः जून ते सप्टेंबर हा पावसाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही वर्षापासून पाऊस जूनमध्ये सुरू होऊन जानेवारीपर्यंत टिकून राहतो. या बदलत्या हवामानामुळे सणासुदींच्या दिवसांमध्ये गोंधळ तर होतोच, पण त्याबरोबर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान सहन करावे. बदलत्या नैसर्गिक चक्रामुळे दैनंदिन जीवनही विस्कळीत व्हायला लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Mulayam Singh | उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचे निधन
- Chandrakant Khaire | शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल
- Shivsena | “… म्हणून काही गारद्यांना शिवसेनेवर घाव घालण्याची सुपारी दिल्लीने दिली”; शिवसेनेचा थेट आरोप
- Shivsena । कितीही संकटे येऊ द्या, त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच!
- Uddhav Thackeray | “उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे”


