Share

Uddhav Thackeray | “उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवले असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येत्या पोट निवडणूकीमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे किंवा ठाकरे गटाला वापरता येणार नाहीय.तसेच शिवसेना हे नाव देखील वापण्यास मनाई असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे. आयोगाने निर्णय दिल्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगली असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे  गटावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, डोक्याच्या रावणाने रामाचं धनुष्यबाण गोठवलं. गोठलेल्या रक्ताची माणसेच अशी कृत्य करतात ज्या शिवसेनेने मोठे केल, तिचाच घात करण्यात आला. धनुष्यबाण गोठवल्याचा आनंद महाशक्तीला आता खूप होत असेल.

भाजप पक्ष मिंधे गटाचा वापर करुन घेत आहे. त्यांचा वापर झाला की त्यांना फेकून देतील. निष्ठा ही विकत घेतली जाऊ शकत नाही. शिवसैनिकांवर दमदाटी केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. तसेच, हा प्रकार इंदिरा गांधी यांच्या काळात सुद्धा झाला नव्हता. ते तुम्ही करत आहात. मग, पापी कोण आहे. दिवस उजाडत असतो दिवस मावळत असतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला असल्याचं पाहायला मिळतं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यामुळे दोन्ही गटाला 10 ऑक्टोबर म्हणजेच आज दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करायचे आहेत. त्याचबरोबर यासंदर्भातील आदेशही आयोगाने शनिवारी निर्णय जाहीर करतानाच दिले असल्यचं समजतं आहे. त्यामुळे कोणत्या गटाला कोणतं चिन्ह मिळणार हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!