नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धाबाबत रोज नवीन खुलासे, वक्तव्य समोर येत आहेत. युद्ध जरी दोन देशांतले असले तरी, त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. त्यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. झापोरिझिया अणु प्रकल्पावरील हल्ल्यानंतर झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) यांनी रशियावर अणु दहशतवादाचा आरोप ठेवला आहे.
दरम्यान रशियाने युक्रेनच्या झापोरिझिया अणु प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यानंतर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, “युक्रेनमध्ये १५ अणुभट्ट्या आहेत, जर अणुस्फोट झाला तर या सर्व नष्ट होईल आणि याचा परिणाम म्हणजे संपूर्ण युरोप संपेल.” या दाव्यामुळे युरोपमध्ये खळबळ माजली आहे.
दरम्यान रशियन माध्यमांनी झेलेन्स्की हे पोलंडमध्ये पळून गेल्याचा दावा केला होता. मात्र ते कीव मध्येचं असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. नुकतेच झेलेन्स्की यांनी व्हिडीओच्या माध्यमातून युरोप वासियांना एक संदेश दिला आहे. त्यात ते म्हणतात की, ” जर युक्रेन वाचलं नाही, तर युरोप सुध्दा वाचू शकणार नाही. त्यामुळं आमच्या समर्थनार्थ उभे राहा.”
महत्वाच्या बातम्या :
- “सत्ता गेली याचा इतका राग…”, संजय राऊतांचा भाजपला जोरदार टोला
- “राज्यपालांच्या खांद्यावर फडणवीसांची बंदूक”, संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
- IND vs SL: काय सांगता! विराट कधी आणि किती धावांवर बाद होणारा ठरल होत; ट्विट होतंय व्हायरल
- “खंडणी, वाजे, नबाब मलिक हीच या सरकारची ओळख”, केशव उपाध्येंचा टोला
OBC Reservation : प्रभाग रचनेसह सर्व प्रक्रिया स्वत:कडे घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

