Share

‘महाराष्ट्राला भीक लागलेली नाही, सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत’

Published On: 

कोल्हापूर : महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं आहे.

आता हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले होते. हे समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील समजत आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांकडे जवळपास 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशी दरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘राज्य सरकारला इंजेक्शनचा पुरवठा करण्यास या कंपन्या नकार देतात. मग प्रवीण दरेकर दीव दमन ला जाऊन भाजपतर्फे राज्याला ५० हजार इंजेक्शन देतील अशी घोषणा करतात. महाराष्ट्र सरकार खंबीर असून राज्याला भीक लागलेली नाही.’ असा घणाघात हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘भाजप अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतोय. रेमडेसिविरसाठी लोकांची धावपळ सुरू आहे. भाजप नेत्यांना ५० हजार इंजेक्शन कशी मिळतात? फार्मा कंपनीच्या मालकासाठी फडणवीस पोलीस स्टेशनला जाऊन बसले. सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपचे नेते हे सगळं करत आहेत,’ अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!