Share

‘फडणवीसांच्या काळात देशात पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात होती’

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पेट्रोलवर अडीच तर डिझेल चार रुपयांनी महागणार आहे. इंधनावरील अबकारी करात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे इंधन स्वत होईल ही अपेक्षा मावळली आहे. अबकारी कराबाबत दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दरवाढीमुळे जनता त्रस्त आहे. यावरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत.

दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्याच्या स्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांची किंमत कमी असतानाही भारतात मात्र,पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने, शिवसेना आजपासून राज्यभर मोर्चे काढत आहे.

यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रहार केला होता. शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये, राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेच्या आंदोलनाचा फोलपणा उघड केला होता.

दरम्यान, यावर कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाष्य केल आहे. ‘दांभिकपणा भाजपाच्या पाचवीलाच पुजला आहे. फडणवीसजींच्या काळात देशात पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात होती. दुष्काळाचा अधिभार दुष्काळ संपला तरी व दारुची दुकाने बंद झाली म्हणून लावलेला सेस दुकाने सुरू झाली तरी वसूल केला होता. आज फडणवीसजी त्यांनी इंधनकर कमी केले असे म्हणतात’, अशा आशयाचे ट्वीट करत सावंत यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!